Wednesday, January 25, 2023

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 26 January 2023 Speech in Marathi for Students | Republic day

By Kulind Krishna

नमस्कार मित्रांनोनमस्कार मित्रांनो आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2023 ( रिपब्लिकन डे) ( republic day speech in marathi ) निमित्ताने मराठी भाषण बघणार आहोत .सदर 26 जानेवारी छोटे भाषण असून लहान मुलांसाठी नक्कीच उपयोग होईल . चला तर रिपब्लिकन डे चे मराठी भाषण सुरू करूया . आजच्या आर्टिकल मध्ये आपण 26 जानेवारी 2023 “प्रजासत्ताक दिन” विषयी भाषण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेत आहोत. दरवर्षी भारतामध्ये 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो इंग्लिश मध्ये याला रिपब्लिक डे (Republic Day) असे म्हटले जाते.

republic day marathi speech

Republic Day Marathi Speech 1

आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा…

आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे दिशदूत माझ्या बंधू भगिनींनो…

अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापूरुषांना वंदन मी करतो… वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारतमातेला, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो…

आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.


Republic Day Speech in Marathi Speech 2 (26 January 2023)


चला तर जाणून घेऊया 26 जानेवारी 2023 Prajasattak Din Marathi Bhashan कसे करावे याविषयी थोडीशी माहिती:

रिपब्लिक डे ऑफ इंडिया (republic day Speech) भाषणाची सुरुवात कशी करावी?

आदरणीय
महोदय, शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…

आज आपण येथे ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत दरवर्षी भारतामध्ये 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारण्यात आले.

भारताचे संविधान हे आपल्या राष्ट्रांची मूलभूत तत्वे आणि कायदे मांडणारे दस्ताऐवज आहे. हे नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य परिभाषित करते आणि आपल्या लोकशाहीसाठी फ्रेमवर्क स्थापित करते. संविधानाने सर्वांना समानता, न्याय आणि स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे.

आपण हा दिवस साजरा करत असताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे त्यांनी अनेक वर्ष ब्रिटिश वसाहतवादी राजवटी विरुद्ध संघर्ष केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे अखेरीस 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तथापि त्यांचे कार्य पूर्ण झाले नाही कारण की ते सर्व नागरिकांचे हक्क आणि स्वतंत्र सुनिश्चित करणाऱ्या संविधानासाठी लढत राहिले.


महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, बी.आर आंबेडकर आणि इतर अनेक अनेकांनी अथक परिश्रम करून सर्वांसाठी न्याय आणि न्याय संविधान तयार केले. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला पण त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्यांच्या चिकाटीमुळेच आज आपल्याकडे संविधान आहे.

आपण हा दिवस साजरा करत असताना संविधानाचे रक्षण आणि जतन करण्याचे महत्त्व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. संविधानात घालून दिलेली तत्वे आणि मूल्य जपणे आणि एक मजबूत आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्य करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

यावर्षी आपण भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत.

प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो

जय हिंद जय भारत

26 January speech in Marathi for Students (Speech 3)


२६ जानेवारीचे भाषण
26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे, 1950 मध्ये भारताचे संविधान लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुट्टी. या दिवशी, भारताचे राष्ट्रपती “राष्ट्राला संबोधित” किंवा “प्रजासत्ताक दिनाचे भाषण” देतात. ” जे राष्ट्रीय दूरदर्शन आणि रेडिओवर प्रसारित केले जाते.

भाषणात सामान्यतः एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश समाविष्ट असतो, गेल्या वर्षातील देशाच्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा आणि आगामी वर्षासाठी सरकारच्या योजना आणि प्राधान्यक्रमांची रूपरेषा दर्शविते. राष्ट्रपती भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर सैनिकांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहतात आणि देशासमोरील सद्य समस्या आणि आव्हानांना देखील संबोधित करतात. राष्ट्रपती भारतातील लोकांना आणि परदेशातील भारतीयांनाही शुभेच्छा देतात.

भाषण सामान्यतः हिंदीमध्ये दिले जाते आणि श्रोत्यांसाठी इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित केले जाते.

हे नमूद करणे योग्य आहे की भारताच्या राष्ट्रपतींचे भाषण सामान्यत: नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून केले जाते, जिथे राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि प्रसंगी 21 तोफांची सलामी दिली जाते आणि फ्लोटची परेड केली जाते. देशाची सांस्कृतिक विविधता दर्शवणारी विविध राज्ये आपली संस्कृती परेडच्या माध्यमातून दाखवतात.


Republic Day Marathi Speech 4 (प्रजासत्ताक दिन भाषण मराठी)


सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक व माझ्या प्रिय वर्ग मित्र-मैत्रिणींनो,

आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा साठी जमलो आहे.आजच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते.

२६ जानेवारी हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे. तो राष्ट्रीय सन आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते.

जसे की आपणा सर्वांना माहितच आहे आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला अर्थात स्वतंत्र झाला पण भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं .

२६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला. म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी "२६ जानेवारी" पासून सुरु झाली. त्यालाच"प्रजासत्ताक दिन" असे म्हणतात.

26 जानेवारी 1950 रोजी भारताने राज्यघटना लागू केली भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने, मेहनतीने, राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता दोन वर्षे 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली.

आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. आपले भारतीय संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय व एकता या तत्वावर आधारित आहे. भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला ते नेहमी तत्पर असतात त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया.

प्रजासत्ताक दिना विषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी संविधान आहे. संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले. गोरगरिबांना पासून श्रीमंता पर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळे मिळाले.

प्रत्येकासाठी कायदा हा सन्मान आहे संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषा भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार तसेच कित्येक अधिकार प्राप्त झाले.

स्वातंत्र्यदिनी ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते.

धन्य धन्य ते संविधान व महान परम पूज्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत

26 january speech in marathi 2023 प्रजासत्ताक दिन चारोळ्या

चला साजरे करूया 
आपल्या सविधांनाचा आदर ,
ज्याने दिला जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार !!

समाप्त  

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी (Speech 5)

प्रजासत्ताकदिनाच्या भाषणात करा ‘या’ मुद्द्यांचा समावेश –

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला.

26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले.

या दिनानिमित्त वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आपण लक्षात ठेवायला हवं.
प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
देशभरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा तसेच संस्थांवर ध्वजारोहन केलं जाते.
Republic Day 2023 : बैठकीच्या पहिल्या रांगेत रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांना मान

आपलं राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे.
भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोकस्तंभावरून घेतली गेली आहे.
राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ हे  बोधवाक्य लिहिलं गेलं आहे, ज्याचा अर्थ ‘सत्याचाच विजय’ असा होतो.
आपल्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती, त्यांची जयंती आपण 2 ऑगस्ट रोजी साजरी करतो.
स्वातंत्र्य दिनाचं भाषण लहान आणि सोपं ठेवा जेणेकरून मुलं गोंधळून जाणार नाहीत आणि त्यातील काही भाग विसरणार नाहीत किंवा मिसळणार नाहीत. वरील वाक्यांशिवाय तुम्ही आणखी माहिती शोधू शकता. एकदा का भाषण तयार झालं की त्याचा काहीवेळा सराव करून घ्या. असं केल्यानं मुलं दमदार भाषण करू शकतील.

तर हे होते Republic Day Speech In Marathi  '२६ जानेवारी' प्रजासत्ताक दिन 'भाषण' मराठी | जर तुम्हाला 26 january speech in marathi pdf पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करा . 26 january speech in marathi 2023 तुम्हाला हे भाषण कसे वाटले या बद्दल कमेन्ट मध्ये नक्की कळवा Happy Republic Day 2023 Marathi Speech PDF Download.

0 comments:

Post a Comment